औरंगपुऱ्यात महिलांची कुचंबणा; स्वच्छतागृहे असून अडचण नसून खोळंबा
शौचालय
स.भु. कॉलेजसमोरील बंद शौचालय. (छायाः सचिन भंडारे)
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): औरंगपुरा हा शहराचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग असूनही इथे महिलांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत. एकीकडे शहर 'स्मार्ट' होत असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे मूलभूत गरजांसाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे येथे स्वच्छतागृहाची इमारत उभी
असतानाही ते बंद अवस्थेत असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
औरंगपुरा परिसर शहरातील प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी एक मानला जातो. येथे दररोज प्रमाणात महिला ग्राहक मोठ्या खरेदीसाठी येतात. याशिवाय परिसरात शाळा, महाविद्यालये आणि विविध
महिलांची सातत्याने मागणी
▶ स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आधुनिक सुविधा उभारण्याचे दावे केले जात असताना, अशा मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महिला व युवतींच्या दृष्टीने ही केवळ असुविधा नसून आरोग्याशी संबंधित गंभीर बाब आहे. स्वच्छतागृह नसल्याने अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. दरम्यान, संबंधित विभागाकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लवकरच ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कार्यालये असल्याने दिवसभर गर्दी असते. अशा ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा अत्यावश्यक असतानाही प्रत्यक्षात ती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी महिलांची गैरसोय लक्षात घेऊन येथे स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. मात्र सध्या हे स्वच्छतागृह
कुलूपबंद असून त्याचा वापर कुणालाही करता येत नाही. देखभाल, पाणीपुरवठा किंवा व्यवस्थापनाच्या कारणांमुळे ते बंद ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे. परिणामी महिलांना पर्यायी सुविधा शोधण्यासाठी भटकंती करावी लागत असून अनेकदा दुकानदारांकडे विनंती करावी लागते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









